जामखेड तालुक्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने पेटवून घेतले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस कर्मचारी सोनाली जाधव हिने पोलीस वसाहतीतील आपल्या राहत्या घरी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली आहे.त्यांनी नेमके पेटवून कोणत्या कारणातून घेतले हे समजू शकले नाही. 


----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
आरडाओरड झाल्याने तिच्या पतीने व पोलिसांनी येथील खासगी दवाखान्यात तिच्यावर प्राथमिक उपचार केले. नंतर तिला तिला नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सोनाली जाधव येथील पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता सोनाली जाधव यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात त्या 30 ते 35 टक्के भाजल्या आहेत, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 

Powered by Blogger.