जामखेडचे बिहार होत आहे,नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, जामखेडचे बिहार होत आहे. जिल्ह्यातील प्रशासन अपयशी ठरत आहे. या परिस्थितीला पालकमंत्री प्रा. राम शिंदे जबाबदार आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. 

जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात या दोघांची हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांची वळसे-पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालकमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे सोपवावा, असेही ते म्हणाले. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.