राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता चौपदरी होणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता चौपदरी होणार असून याबाबत प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. नवी दिल्ली येथील सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या २७ किलोमीटर मार्गावरील जमीन हस्तांतरणाचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असून सर्वेक्षण होताच जमीन हस्तांतरणाचे राजपत्र प्रसिद्ध होईल. 


राष्ट्रीय महामार्ग १६० सी (नगर-कोपरगाव रस्ता) राहुरी खुर्द (सोनईफाटा) ते शनिशिंगणापूर आणि तेथून राष्ट्रीय महामार्ग ७५३ (नगर-औरंगाबाद रस्ता) घोडेगावपर्यंत रस्त्यालगतच्या जमिनीचे हस्तांतरण केले जाणार अाहे. सर्वेक्षण झाल्यावर जमीन हस्तांतरणाचे राजपत्र प्रकाशित करण्यात येणार आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.