सत्ता बदलल्याने देशात परिवर्तन होणार नाही, व्यवस्था परिवर्तनाची गरज - अण्णा हजारे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :फक्त सत्ता बदलल्याने देशात खरे परिवर्तन होणार नाही. त्यासाठी व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे. व्यवस्था परिवर्तनाची नवी चळवळ उभारणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 


नव्याने संघटनेची बांधणी करण्याकरिता २८ व २९ एप्रिलला राज्यातील १३ जिल्ह्यांतील प्रतिज्ञापत्र दिलेल्या १२५ कार्यकर्त्यांची कार्यशाळा राळेगणसिद्धी येथे घेण्यात आली. पुढील टप्प्यात प्रत्येकी १२५ ते १५० कार्यकर्त्यांच्या ४ ते ५ कार्यशाळा घेऊन ७५० कार्यकर्ते प्रशिक्षित होऊन आपापल्या जिल्हा, तालुका व गावात संघटन उभे करण्याच्या प्रयत्नास लागणार आहेत.

वर्षभरात या कार्यकर्त्यांचे कार्य दृष्य स्वरूपात दिसू लागल्यास राजकिय पक्ष व नेते स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत जे अपेक्षित जनहिताचे काम करू शकले नाहीत, त्यापेक्षा अधिक प्रभावीपणे हे कार्यकर्ते काम करू शकतील, असे हजारेंनी म्हटले आहे.

Powered by Blogger.