राहुरी तालुक्‍यातील प्रवरा कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्‍यातील चिंचोली फाट्याजवळ प्रवरा उजव्या कालव्यात कोल्हार खुर्द येथील पाटीलवाडीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यासंदर्भात राहुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शुक्रवारी रात्री पाटीलवाडी येथील तरुण कैलास रामदास ठाकरे हा 24 वर्षांचा तरुण घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी शोध घेऊनही सापडला नाही. 


शनिवारी सकाळी 10 वाजता काही महिला या कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता कालव्याच्या एका बाजूला चारी क्रमांक 28 जवळ मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही घटना परिसरात समजली. हा कैलासचाच मृतदेह असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी ओळखले. मृत कैलास विवाहित असून त्याला चार मुली आहेत. आई-वडिलांसह मोलमजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.