जीपचे ब्रेक निकामी होवून दरीत कोसळल्याने आजी व नातवाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्‍यातील केळी-कोतूळ घाटात खासगी वाहतूक करणाऱ्या जीपचे ब्रेक निकामी होवून झालेल्या अपघातात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. तर चार जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला.


वाघमारे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक केळी-कोतूळ येथील शुक्रवारी मध्यरात्री आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम उरकून मुंबई येथे नोकरीच्या ठिकाणी जात होते. यावेळी केळी-कोतूळ येथील घाटातील अवघड वळणावर कमांडर जीपचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने जीप खोल खड्ड्यात कोसळली.

यात कल्पना अशोक वाघमारे (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या बरोबर त्यांचा नातू आयुष आनंदा वाघमारे (वय 2) हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा लोणी येथे उपचारा दरम्यान मृत झाला. तर भारत माळवे, सुभाष माळवे (रा.बदगी बेलापूर), विशाल अशोक वाघमारे, भास्कर तुकाराम वैराळ हे (रा. केळी कोतूळ) जखमी झाले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.