जि.प सदस्य तनपुरेंसह चार जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सहकारी संस्था उपलेखापरिक्षक माणिक सोनटक्के यांनी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे यांच्यासह इतर चार जणांवर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोन वषांर्पूर्वी घडलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात काल सोनटक्के यांनी फिर्याद दाखल केली असून, त्यात त्यांनी गुन्हा दाखल करण्यास का उशीर झाला, याचा संदर्भ दिला आहे. 


मिरजगाव येथील हेरंब गृहनिर्माण सहकारी संस्था, मर्या. मिरजगाव, या संस्थेवर अवसायक म्हणून माणिक शिवराम सोनटक्के यांची नेमणूक करण्यात आली होती. दि. ५ जानेवारी २०१६ रोजी साडेअकरा वा.च्या सुमारास संस्थेचा अवसायक म्हणून निंबधकांच्या आदेशान्वये संस्थेच्या दप्तरचा ताबा घेण्यासाठी आपण गेलो असता, आपल्याला जबर मारहाण करण्यात आल्याची फिर्याद सोनटक्के यांनी काल कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. 

या फिर्यादीत सोनटक्के यांनी तनपुरे यांच्यासह इतरांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. श्री. तनपुरे यांच्यासह बाबासाहेब एकनाथ कंक, उमेश विश्वनाथ देवकर, प्रमाणित लेखापरिक्षक संभाजी विठोबा टकले, भाऊसाहेब नामदेव शिंदे यांच्याविरुध्द शासकीय अधिकारी यांना मारहाण करणे, शासकीय दस्तऐवज गहाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आदी कलमान्वये वरिष्ठांशी चर्चा करून व परवानगी घेऊन फिर्याद दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.