महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण लांबविले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण चोरून दोघा चोरट्यांनी धुमसटाईलने पोबारा केल्याची घटना रविवारी (दि.२९) दुपारी तीन वाजता घडली. या घटनेमुळे पुन्हा गंठण चोरांनी शहरात डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप कारभारी साळगट कुटुंबासह शहरातील इंदिरानगर याठिकाणी राहात आहे. रविवारी दुपारी पत्नीसह दोघे जण अल्टो कारमधून भाजीपाला आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आले. साळगट यांची पत्नी यांनी भाजीपाला घेऊन कारमध्ये बसण्यासाठी आल्या असता त्याच दरम्यान मोटारसायकलवरून मागून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून धूमस्टाईलने पोबारा केला.

साळगट यांच्या पत्नीने आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपयंर्त भामटे पसार झाले. एकूण ७० हजार रुपये किंमतीचे हे सोन्याचे गंठण होते. याप्रकरणी दिलीप साळगट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १३७ / २०१८ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.