पोलीस लॉन्‍स व बॅक्वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलची उभारणी करुन पोलीस प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपण्‍याचे काम केले. या बहुउद्देशीय हॉलचा निश्चितच चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे केले.


पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलचे उदघाटन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी जिल्‍हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्‍हणाले, पोलीस प्रशासनाने बहुउद्देशीय हॉलची उभारणी करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. कर्तव्‍य बजावत असताना पोलीस प्रशासनाने केलेले हे कौतुकास्‍पद काम आहे. गरजुंना या हॉलचा निश्चित उपयोग होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पोलीस प्रशासनाने उभारलेला बॅक्‍वेट हॉलचा चांगला उपयोग होईल हा उपक्रम कौतुकास्‍पद असल्‍याचे जिल्‍हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले.जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार यांनी प्रास्‍ताविक करतांना पोलीस प्रशासनाने उभारलेल्‍या पोलीस लॉन्‍स व बॅक्‍वेट हॉलची सविस्‍तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार पोलीस उपअधिक्षक अरुण जगताप यांनी मानले

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.