संगमनेर तालुक्यातील डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील सर्वच डोंगर जवळपास आगीच्या भक्षस्थानी सापडले आहेत. तर पठारभागातील मोठ्या प्रमाणात डोंगर जळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या आगीत वनविभागाचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाचे नुकसान होवूनही अद्याप प्रतिबंधात्मक कारवाई केली नसल्याने आश्चर्च व्यक्त केले जात आहे.दरवर्षी तालुक्यात उन्हाळ्यामध्ये वनविभागाचा वतीने जाळपट्टे काढले जातात. काही ठिकाणी जाळपट्टे काढले जात नसल्याने आग लागल्यास डोंगर जळतात. त्याच बरोबर अनेक छोटी मोठी झाडे, सरपटणारे प्राणी या आगीमध्ये जळून खाक होतात. मात्र या घटनेकडे वनविभागाचे मात्र सपशेल दुर्लक्ष झाले आहे. . याही वर्षी पठारभागात अनेक दिवसांपासून डोंगर जळण्याची मालिकाच सुरू झाली आहे.

एक एक करून पठारभागातील सर्वच डोंगर जळून खाक झाले. एका डोंगराची आग विझवली की लगेच दुसऱ्या डोंगराला आग लागत आहे. यावर्षी पठारभागातील डोंगर जळून खाक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. वनांचे संरक्षणासाठी गावोगावी वनकमिट्या स्थापन करण्यात आल्या. वनकमिट्या मात्र नावालाच उरल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.