श्रीगोंद्यात भरदिवसा घरफोडी, सव्वा लाख रूपयासह चार तोळ्यांचा ऐवज लंपास

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार शिवार परिसरातील काशीबारव येथील राहणारे मोहन चंद्रभान चेमटे यांच्या घरी शनिवार दि. १२ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चोरांनी दिवसाढवळ्या चोरी केली.


यात जवळपास सव्वा लाख रुपये रोख व चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीला गेला आहे.भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीची सर्वत्र चर्चा झाली. तसेच दिवसा चोरी झाल्यामुळे नागरिकांत चोरांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील बेलवंडी कोठार शिवारातील श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावरील काशीबारव जवळ राहणाऱ्या मोहन चंद्रभान चेमटे यांचे रसवंतीगृह आहे. . काही दिवसांपूर्वीच चेमटे यांच्या मुलीचे लग्न झाल्यामुळे त्यांना आहेरापोटी आलेली रोख रक्कम व दागिने असा ऐवज घरात ठेवला होता. 

आज नेहमीप्रमाणे ते त्यांच्या पत्नीसमवेत घराला कुलूप लावून जवळच असलेल्या त्यांच्या रसवंतीगृहावर गेले असता, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काही चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला, आणि घरातील सामानाची उचकापाचक करून त्यांच्या घरातील पेटीत ठेवलेले चार तोळे सोन्याचे दागिने व सव्वा लाख रुपये रोख असा ऐवज चोरून नेत पोबारा केला. 

याबाबत चेमटे यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. . घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांनी भेट दिली. श्वानपथकाला देखील बोलावण्यात आले होते. रात्री उशिरा या घटनेबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान आज झालेल्या या धाडसी चोरीने एकच खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.