राहुरीत वाळूच्या वाहनाखाली दुचाकीस्वारांना चिरडण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोडवर वाळूने भरलेल्या चारचाकी वाहनाखाली दुचाकीवर चाललेल्या दोघा तरुणांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना  रात्री घडल्याने या परिसरातील नागरीकांमधे दहशतीचे वातावरण पसरले आहे.शहरातील तनपुरेवाडी परिसरातील मुळानदी पात्रातुन रात्रीच्या दरम्यान टेंम्पो व तिन चाकीच्या रिक्षाच्या सह्याने वाळूतस्करी मोठ्या जोमाने सुरु आहे.


महसुल व पोलिस प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता वाळू तस्कर शिरजोर झाले आहेत. रात्री या रस्त्याने येणाऱ्या नागरीकांना या तस्करांच्या सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागत आहे.येणारे जाणारे नागरीक काही बोलल्यास वाळूतस्कर दमबाजी करत दहशत पसरवत असल्याने नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरातील दोघे तरुण दुचाकीवर तनपुरेवाडी भागाकेड जात असताना समोरुन वाळूने भरलेला व रस्त्याने सुसाट वेगाने येणाऱ्या टेम्पोने या दुचाकीवरिल तरुणांना जोराची धडक दिली. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजुबाजुचे नागरीक जागे झाले. यावेळी दोन तरुण बेशुध्द अवस्थेत पडलेले होते. यामधे एक सागर नावाचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्या ठिकाणी वाळूवाहतुक करणाऱ्या वाहनाच्या मालकाने येवुन प्रकरण मिटवा मिटवी करण्याचा प्रयत्न केला. 

नागरीकांनी या वाळूतस्करावर चांगलेच तोंडसुख घेतले मात्र वाळूतस्कराने या नागरीक व महिलांवर दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.'लागलेल्या तरुणाचे आम्ही बघुन घेवु. तुम्ही बोलण्याची गरज नाही. अन्यथा तुमच्याकडे बघावे लागेल' असा दम त्याने नागरीक व महिलांना भरल्याचे बोलले जात आहे.सागर नामक तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याची परिस्थीती नाजुक असल्याने त्यास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले असल्याचे समजले आहे. 

सदर प्रकार हा तनपुरेवाडी रोडलगत भंगार दुकानासमोर घडला आहे.. तनपुरेवाडी परिसरातील तिळेश्वर मंदिरा नजिकच्या एका शेतकऱ्याच्या खाजगी जमिनीतून वाळू तस्कर बेकायदा वाळू उपसा करीत असून सदर शेतकऱ्याने वाळू तस्कराना सांगून सुद्धा ते ऐकण्यास तयार नसून उलट वाळू तस्कर दमबाजीची भाषा करीत आहेत. शहरातील वाळू तस्करांशी पोलिसांचे आर्थिक हितसंबंध असल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.