...आणि त्या विद्यार्थ्यांना आ.डॉ.सुधीर तांबेमुळे परीक्षेस बसता आले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एमएचटी-सीईटी परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ जिल्ह्य़ातील ९३ विद्यार्थ्यांवर आली होती. वेळीच त्यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना फोन केल्यावर तातडीने सूत्रे हलली. त्यामुळे प्रवेशपत्र उपलब्ध होऊन या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता आले. 


९३ विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करुनही प्रवेशपत्र मिळाले नव्हते. परीक्षेपूर्वी पंधरा दिवस अगोदर विद्यार्थी व पालक प्रवेशपत्रांची प्रतीक्षा करत होते. तक्रार करुनही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे परीक्षेस बसता येणे अवघड झाले होते. पर्यायाने वर्ष वाया जाण्याचा धोका होता.

यासंदर्भात डॉ. ललित सावंज यांनी आमदार तांबे यांचे लक्ष वेधले. त्यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर सूत्रे हलली. परीक्षेच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर प्रवेशपत्रे उपलब्ध झाली, तसेच मोबाइलवर विशेष संदेश मिळाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.