नगराध्यक्ष वहाडणेंच्या विरोधात तहसिलदार अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपणावर दहा लाख रुपये रोज हप्ता घेत असल्याचा आरोप केला आहे. तो बेछुट आहे. त्यांनी तो सिध्द करून दाखवावा. आपण त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे तहसिलदार किशोर कदम यांनी पत्रकारांना सांगितले. आपल्या कारकिर्दीत वाळू तस्करांकडून साडेचार कोटी रूपयांचा महसूल वसूल करत ३५५ वाहनांवर कारवाई केल्‍याचे त्यांनी सांगत अपुऱ्या मनुष्य व तांत्रीक बळामुळे वाळू तस्‍करी रोखण्यास हतबल असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी कबूल केले. 


तहसिलदार किशोर कदम म्हणाले कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठी असणाऱ्या ३२ गावात २-३ वाळूसाठे आहेत. त्यापैकी पाच ठिकाणचे वाळू लिलाव झाले आहेत. धारणगाव क्रमांक दोन व मायगावदेवी या दोन ठिकाणाहुनच प्रत्यक्षात वाळू उपसा सुरू आहे. आपल्याकडे दोन अधिकाऱ्यांसह १५ ते २० कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. वाहनांचाही तुटवडा आहे. पोलीस बळही अपुरे आहे. त्यामुळे आम्ही वाळू चोरट्यांपयंर्त पोहचू शकत नाही. 

या दोन ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यावर सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी त्यांना रोखत सीसीटीव्ही फुटेज का देत नाही,अशी विचारणा केली. त्यावर मात्र तहसिलदार कदम निरूत्तर झाले.

सन २०१६-१७ मध्ये १४९ बेकायदा वाळू वाहणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांच्यापैकी २ कोटी ४६ लाख दंड वसूल केला. त्यात ४८ वाहनांवर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ७७ वाहनांवर कारवाई करत १ कोटी ५१ लाख ८४ हजार रूपयांचा दंड वसूल केला. त्यात ४९ वाहनांवर पोलिस कारवाई केली. एप्रिल २०१८ ते आजपयंर्त ४२ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २५ लाख २७ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. 

३ वाहनांवर कारवाई केली. दोन पेक्षा जादा वाळू वाहतुक करताना पकडण्यात आलेल्या १७ वाहनांना मोडीत काढण्याची कारवाई प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा अभाव असताना अनेकदा जीव धोक्यात घेवून पोलिसांचे सहकार्य घेवून आपण रात्री बेरात्री बेकायदा वाळू उपशाविरोधात कारवाई करीत असतो,असे तहसिलदार कदम यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.