मांजरसुंबा येथे १३ मे रोजी महाश्रमदानाचे आयोजन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वर्षानुवर्षे पाचवीला पुजलेला दुष्काळ कायमचा दूरकरण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागात सध्या पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे तुफान आल आहे.पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि मांजरसुंबे ग्रामस्थांच्या पुढाकाराने रविवारी (१३ मे) रोजी नगर तालुक्यातील मांजरसुंबे येथे श्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 


सकाळी ६ ते १० या कालावधीत महाश्रमदान होणार आहे. या उपक्रमात उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखालील आय लव्ह नगरची टीमही सहभागी झाली आहे, अशी माहिती बीजेएस नगरचे जिल्हाध्यक्ष तथा या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक आदेश चंगेडिया यांनी दिली.

यावर्षीच्या स्पर्धेतील हे शेवटचे महाश्रमदान असून यापूर्वी सहभागी झालेल्यांना, तसेच नव्याने श्रमदान करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी असणार आहे. ग्रामीण भागाला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून हजारो हात श्रमदान करून घाम गाळत आहेत. 

मिस कॉल देवून सहभाग निश्चित करा
महाश्रमदान उपक्रम राबविताना प्रत्येकाला त्यात पुरेपुर योगदान देता येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने याउपक्रमात सहभागी होवू इच्छिणार्यांनी ८६९६७११७७७ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास त्यांना संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली जाईल. याशिवाय http://bit.ly/BJSnagar वेबलिंकवर क्लिक करूनही नोंदणी आणि अन्य माहिती मिळवता येईल. आपले श्रमदानाचे एक पाउल ग्रामीणभागाचे भविष्य उज्वल करणारे ठरणार आहे.त्यासाठी आवर्जून या महाश्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.