पुणे-नगर-औरंगाबाद महामार्ग होणार ८ पदरी,नगरकरांचा पुणे प्रवास दीड तासांत शक्य.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे-अहमदनगर-औरंगाबाद अशा २३५ किलोमीटरचा रस्ता आठ पदरी (लेन) करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. राज्य सरकारकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (भारतमाला) वर्ग करण्यात आला आहे.यासाठी 1200 कोटी रुपयांचा डिटेल प्रोजक्ट रिपोर्टला (डिपीआर) विधीमंडळाच्या अधिवेशनात मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे लवकरच आठपदरी रस्त्यात रुपांतर होणार आहे.

नगरकरांचा पुणे प्रवास अवघ्या दीड तासांत शक्य!
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यामुळे पुणे - औरंगाबाद हे अंतर तीन तासांत पार करता येईल, तर नगरकरांचा पुणे प्रवास अवघ्या दीड तासांत शक्य होणार आहे. या संपूर्ण रस्त्यांचे काम पाहण्यासाठी अहमदनगर येथील मार्केटयार्ड येथे मध्यवर्ती कार्यालय ही सुरू करण्यात आले आहे. ६० मीटरपेक्षा अधिक भूसंपादन करावे लागणार असल्याने पहिल्या टप्यात पुणे ते अहमदनगर वाढीव भूसंपादन तर दुसर्या टप्प्यात अहमदनगर ते औरंगाबाद असे भूसंपादन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
                               
                        

चौपदरीकरण होवून 12 वर्ष पूर्ण !
पुणे-नगर-औरंगाबाद या 235 कि.मी महामार्गाचे चौपदरीकरण होवून 12 वर्ष पूर्ण झाले आहे. सन 2006 पासून या महामार्गावरील वाहतूक वाढल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामध्ये नगर ते पुणे हा प्रवास नगरकरांना अक्षरश: जीवघेणा ठरत आहे पुर्वी या रस्त्यावर राज्य सरकारची मालकी होती. त्याअंतर्गत या रस्त्याचे पूर्वी चौपदरी करण केले होते.

आठपदरी रस्त्यात रुपांतर होणार ! 
मागील काही वर्षात येरवडा, वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कारेगाव आदि महत्वाच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सुटावी. तसेच या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यात यावे, यासाठी स्थानिक आमदार, खासदार आणि विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचा पाठपुरावा सुरू होता. परंतु हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्याने रस्त्याचे थेट आठपदरी रस्त्यात रुपांतर होणार आहे.

उड्डाणपुलांमुळे महामार्गाला नवसंजीवनी !
नगर ते पुणे असा दैनंदिन प्रवास करणारे नगरमधील हजारो प्रवासी आहेत. हा प्रवासातील 110 किमीचे अंतर अवघे अडीच तासांचे, परंतु वाहतूक कोंडीमुळे या प्रवासाला तब्बल पाच तास लागतात. कोरेगाव, शिक्रापूर ते वाघोलीपर्यंतच्या वाहतूक कोंडीत तब्बल दोन तास जातात. या महामार्गावरील शिरूर ते पुणे अशी 70 किमीची वाहतूक कोंडी नित्याची बनली असून अपघातांची संख्या हा चितेंचा विषय बनला आहे. कोरेगाव, वाघोली, शिक्रापूर व कोरेगाव भीमा येथे उड्डाणपूल होणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.