भिंगारमधून चार तलवारी जप्त,पाच जणांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगारमधील गौतमनगर येथील एका घरातून दोन, तर हॉटेलमधून दोन अशा चार तलवारी भिंगार कॅम्प पोलिसांनी जप्त केल्या असून, या तलवारी बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी ही कारवाई झाली असून, पकडलेल्या आरोपींकडे आणखी शस्त्रांबाबत पोलिस तपास करीत आहेत. 


गोरखनाथ मारुती भिंगारदिवे, दीपक बाळू धिवर, कानिफनाथ मारुती भिंगारदिवे, गणेश पांडुरंग भिंगारदिवे (रा. गौतमनगर, भिंगार), सुनील राजाराम शेळके (केतकी, नगर) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी आपल्या घरात बेकायदा तलवारी ठेवल्या असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार सहायक निरीक्षक पाटील यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, जयश्री काळे, संजय कवडे, दीपक पाठक यांनी गौतमनगर येथील एका घरात छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. घराची झडती घेतल्यानंतर घरातील कॉटमध्ये ठेवलेल्या दोन धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या.

 या आरोपींकडील चौकशीत नगर तालुक्यातील केतकी येथील हॉटेल संस्कृतीमध्ये आणखी तलवारी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून हॉटेल मालक सुनील राजाराम शेळके याला ताब्यात घेऊन हॉटेलमधून दोन तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.