नगरसेवक योगीराज गाडे, सचिन जाधव यांच्यासह १७ जणांना जामीन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव मनपा पोटनिवडणुक निकालाच्या दिवशी दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या न्ययालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे, माजी स्थायी समिती सभापती सचिन जाधव यांच्यासह १७ जणांना न्यायालयाने प्रत्येकी २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. 

केडगाव येथे दोघा शिवसैनिकांच्या हत्येनंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात सुरुवातीला शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे, रावजी नांगरे, राजेश सातपुते, प्रफुल्ल साळुंके, दत्ता नागापुरे, गिरीष शर्मा, अमोल येवले, सुनील वर्मा, अभिजीत राऊत हे पोलिसांसमोर हजर झाले त्यानंतर नगरसेवक सचिन जाधव, अशोक दहिफळे, दिपक कावळे, रमेश भाकरे, विठ्ठल सातपुते, सुशांत म्हस्के, सचिन राऊत, राजेंद्र पठारे यांना पोलिसांनी अटक केली.

अटक केलेले सर्व १७ आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असल्याने नाशिक कारागृहात आहेत.आरोपींच्यावतीने न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी (दि. 11) सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

आरोपींना सायंकाळी जामीन मंजूर झाल्यानंतर नगरसेवक सचिन जाधव, योगिराज गाडे, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, रावजी नांगरे, अमोल येवले, विठ्ठल सातपुते, राजेंद्र पठारे यांनी तातडीने जातमुचलक्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे 7 जणांची शनिवारी सकाळी कारागृहातून सुटका होईल. 

उर्वरीत 9 जणांची जातमुचलक्याची कायदेशीर पूर्तता पूर्ण होऊ शकली नाही. सलग दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका होईल. जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने 9 शिवसैनिकांचा कारागृहातील मुक्काम दोन दिवसांची वाढला आहे..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.