जामखेड पंचायत समितीत चाळीस लाखांचा अपहार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मयत सेवानिवृत्तधारकांची नावे बँकेला दाखवून त्यांची निवृत्ती पेन्शनची रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा करण्याचा गेेली दीड वर्षांपासून सुरू असलेला प्रकार जामखेड पंचायत समितीत उघड झाला आहे. याची वाच्यता होताचा संबधीत कर्मचारी दोन दिवसांपासून फरार झाला आहे.अपहार झालेली रक्कम अंदाजे चाळीस लाखाच्या घरात असल्याचे समजते.

याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लेखा व वित्त विभागाची त्रिसदस्यीय समिती पंचायत समितीत गुरुवारी दाखल झाली. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी विभागाला लावलेले सील तोडण्यास सांगून दोन वर्षांतील कालखंडातील सर्व कागदपत्रे तयार करण्यास सांगितले.

पंचायत समितीकडून अधिक माहिती घेतली असता, जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीतील वेगवेगळ्या खात्यातील निवृत्त पेन्शनरची संख्या 650 च्या आसपास आहे. या पेन्शनरांचे काम पाहण्यासाठी पंचायत समितीत स्वतंत्र विभाग आहे. या सर्वांचे खाते सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, प्राथमिक शिक्षक बँक व जिल्हा सहकारी बँक शाखा जामखेड अशा वेगवेगळ्या बँकेत आहेत.

पंचायत समितीच्या या अपहार झालेला रकमेचा आकडा चाळीस लाखांच्या आसपास असला तरी तो वाढण्याची शक्यता आहे. कक्ष अधिकारी छैलकर हे गुरुवारी संबधीत कर्मचार्‍याच्या घरी जाऊन आले. परंतु तो घरी आढळून आला नाही. संबंधित कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.