चितळे रोडवर खा.दिलीप गांधी यांनी लक्ष घातले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या चितळे रोडवर आजपर्यंत फक्त राजकारणच होत होते. मात्र, चितळे रोडचा विकास व्हावा, यासाठी कोणीही पुढे आले नाही. विकासाच्या वल्गना करणाऱ्यांनी प्रत्यक्ष विकास कधी केलाच नाही. मिरावली बाबा दर्गा हे धार्मिक स्थळ सर्वधार्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी अत्याधुनिक आयएसआय मार्क असलेला व उच्च दर्जाचा हायमॅक्स लावून चितळे रोड उजळवला आहे. आता या उजेडात चितळे रोडवरील काळे धंदे बंद होतील, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले. 


चितळे रोडवरील मिरावली बाबा दग्र्याजवळ खासदार विकास निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक उंच हायमॅक्सचे लोकार्पण वाढदिवसाचे औचित्य साधून खा. दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक किशोर डागवाले, भाजपा मध्यमंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, ललित गांधी, मिरावली यंग सर्कलचे अध्यक्ष अशफाक शेख, प्रमुख सल्लागार अन्वर खान, भाजपा सरचिटणीस किशोर बोरा, लीला अगरवाल, सागर गोरे, खलील चौधरी, नाना भोरे, रफिक शेख, अन्सार शेख, हनिफ शेख आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

चितळे रोडवर खा.दिलीप गांधी यांनी लक्ष घातले ! 
या वेळी बोलताना डागवाले म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांनी चितळे रोडवरील हा अत्याधुनिक हायमॅक्स उभारून , मग लोकार्पण केले. मात्र, महापालिकेत अनेक पथदिव्यांचे बोगस बिले काढून मलिदा खाल्लेला नगरकरांनी पाहिला आहे. चितळे रोडवर खा. दिलीप गांधी यांनी लक्ष घातले आहे. शहराच्या विकासाकरिता खा. गांधी यांच्याएवढे योगदान यापूर्वी कोणीही दिले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.