प्रसिद्धीतून नव्हे, विकासकामे करून श्रेय घेतो - आ. औटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रसिद्धीतून नव्हे, तर विकासकामे करून त्याचे श्रेय मी घेतो. गेल्या १३ वर्षांत वडझिरे परिसरात आपण परिवर्तन घडविले असून, त्याचे श्रेय घेण्याची कोणी धडपड करू नये, असा टोला आमदार विजय औटी यांनी लगावला. पारनेर ते बेल्हे मार्गावरील वडझिरे येथील १ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे आ. औटी यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. 


या वेळी जि. प. सदस्य काशीनाथ दाते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, राजाराम एरंडे, सोनाबाई चौधरी, सुजाता गाजरे, सुवर्णा वाळुंज, अधीक्षक अभियंता पी. बी. भोसले, कार्यकारी अभियंता दयानंद विभुते, उपविभागीय अभियंता ए. एम. कडूस आदी उपस्थित होते. 

आपल्या पारनेर तालुक्यातील ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी Join व्हा अहमदनगर लाइव्ह च्या श्रीगोंदा स्पेशल Whatsapp ग्रुपला ! पुढील लिंकवर क्लिक करून 

आ. औटी म्हणाले, नदीला आलेल्या पुरामुळे याच ठिकाणावरून प्रवासी वाहन वाहून गेले व त्यात प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर या नदीवरील पुलासाठी माझा पाठपुरावा सुरू होता. अलिकडच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये या पुलासाठी १ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद होऊन अल्पावधीत दर्जेदार काम पूर्ण झाले. जनतेचे दैनंदिन दळणवळण सुलभ व्हावे, शेतकरी वर्गाच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच अर्थसंकल्पीय तरतुदींमधून तालुक्यातील विविध रस्ते, पुलांसाठी निधी खेचून आणला. 

ग्रामविकास विभागाची कामेही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आल्याने सर्वच कामांचा दर्जा चांगला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी ही एकाच रथाची दोन चाके असून, ती बरोबर चालली तर विकास होतो, तालुक्यात हेच चित्र पहावयास मिळते आहे. त्याच माध्यमातून वडझिरे परिसरात मोठे परिवर्तन घडले, त्याचे श्रेय घेण्याची काहीजण धडपड करीत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.