नगर बायपासवर कार चालकाला लुटणारे गजाआड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर बायपासवर शेंडी गावाजवळ एका कार चालकाला पाच लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. बुधवारी सायंकाळी लुटीची घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना पकडले.


आदेश मच्छिंद्र वाघ, बाळासाहेब बन्सी मोरे, रमेश नानाभाऊ आव्हाड, किरण पोपट खरमाळे, सोन्या बाळासाहेब आढाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, हे आरोपी नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जनी गावातील आहेत. पुणे येथील कैलास ज्ञानोबाराय कांबळे हे बायपासने शेंडी गावाजवळून जात होते.

कांबळे यांनी स्पीड ब्रेकरजवळ गाडीचा वेग कमी केल्यानंतर दुसरी ओमनी व्हॅन येऊन त्यांच्या गाडीला अडवी लावली. 'गाडीला कट का मारला', असे म्हणून आरोपींनी कांबळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीतील कांबळे यांचा भाचा व वडिलांना आरोपींना मारहाण केली.

कांबळे यांच्याकडील पाच लाख रुपयांची रक्कम, एक मोबाइल हिसकावून नेला. कांबळे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला ही माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. गोरे यांनी तपास करून गुरुवारी पाच ही आरोपींना जेरबंद केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.