केडगाव दुहेरी हत्याकांड ; भानुदास कोतकरचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी असलेल्या भानुदास कोतकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी वकिला मार्फत अर्ज दिला असून या अर्जावर  गुरुवार (दि. १७) रोजी सुनावणी होणार आहे.केडगाव येथे दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर भानुदास कोतकर यांच्यासह अन्य चार-पाच जणांविरुद्ध हत्येचा कट रचल्याप्रकरणी १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


लांडेप्रकरणात आजारपणाच्या कारणाने जामीन मिळालेल्या असल्याने त्याच कारणा वरून त्यांनी हा अर्ज सादर केला.कोतकर यांच्या जामिनाबाबत सरकार पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि. १७) म्हणणे मांडण्यात येणार आहे अशी माहिती ऍड. महेश तवले यांनी दिली.त्यावेळी भानुदास कोतकर हे लांडेखून प्रकरणात निकाल लागे पर्यंत जामिनावर सुटलेले आहेत. त्यांना नगर जिल्हा बंदी असल्याने त्यांचे वास्तव्य जिल्ह्याबाहेर आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.