फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वृत्तपत्रात जाहिरात देवून कर्ज घ्या असे म्हणणाऱ्या एका फायनान्स कंपनीने एका शेतकऱ्याला ८७ हजार १०० रुपयाला फसविले आहे. या प्रकरणी लोणी पोलिसांत दिल्लीच्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील शेतकरी मच्छिंद्र दामोधर मुसमाडे यांनी लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी राजकुमार प्रजापती व निरज शर्मा (दोघे रा.दिल्ली) यांच्या विरुध्द भा.द.वि.कलम ४२०, ३४ प्रमाणे गु.र.नं.१०३ दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी वर्तमान पत्रातील जाहिरातीच्या आधारे शेतकऱ्याची ८७ हजार १०० रुपयाला फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी स.पो.नि.गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.फटांगरे हे पुढील तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.