डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयात संताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-औरंगाबाद महामार्गावरील एका रुग्णालयात महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. हे रुग्णालय महामार्गाजवळच असल्यामुळे या परिसरात रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नातेवाईकांची गर्दी व शहरात झालेल्या परिक्षेमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी यामुळे सदर परिसरातील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. 


नातेवाईकांचे आक्रमक रुप पाहून रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिस प्रशासनास माहिती कळविली. यावेळी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यास बराच कालावधी लागला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.