पोलीस निरीक्षकाला खंडणी मागणाऱ्या आरोपीची अटक व सुटका

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नामदेव कडनोर यांना 'तुम्ही घरात घुसून कोम्बिंग ऑपरेशन का केले' असे म्हणत अश्लील शिवीगाळ, दमदाटी करून गावठी कट्टाने मारून तुला जगू देणार नाही अशी भ्रमणध्वनीवरून धमकी देऊन दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपी कैलास देवराम कोळपे याला ग्रामीण पोलीसांनी बुधवारी रात्री १ वाजता अटक करून ताब्‍यात घेतले. दुपारी न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याची जामीनावर मुक्‍तता केली अशी माहिती पो.नि.कडनोर यांनी दिली.


कोळपे याने पोलीस निरीक्षक साहेबराव नामदेव कडनोर यांना मोबाइलवरून 'मंत्र्यांना सांगून निलंबित करतो तुला निलंबित व्हायचे नसेल तर दहा लाख रुपये घेऊन ये' अशी दमदाटी करून अश्लील व उद्धट भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पो.ना. ७९२ अशोक शिंदे यांना देखील दरोड्याची केस टाकण्याची धमकी दिली होती. कोळपे हा काही दिवसांपूर्वी तडीपारही होता. त्याने तडीपारीला स्थगिती आणली आहे तसेच त्याच्यावर बलात्कार, विनयभंग, घरात घुसून पळून नेणे आदि गुन्हे दाखल आहेत. तसेच वेळापूर येथील तलाठी शिंदे व ढोरमारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पो.नि.साहेबराव नामदेवराव कडनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु. र. नं. ६५ /२०१८ भादंवि कलम ३८४, ५०६ ड, व ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर खंडणीबहाद्दर आरोपी कैलास कोळपे याला पोलीसांनी बुधवारी रात्री १ वाजेच्‍या सुमारास अटक केली. त्‍याला गुरूवारी दुपारी न्‍यायालयासमोर हजर केले असता न्‍यायालयीन कोठडी सुनावली व त्‍याची जामिनावर सुटका झाली अशी माहिती पोलीस निरिक्षक साहेबराव कडनोर यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.