नगर शहरातील ट्राफिक जामचा पालकमंत्री राम शिंदेना फटका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सीईटीची पेपर सुटल्यावर नगर शहरात काल सायंकाळी पाच वाजता मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आली. यामुळे नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड आणि शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.आयुर्वेद महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना बराच वेळ अडकून पडावे लागले.

पालकमंत्री राम शिंदे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयुर्वेद कॉलेजच्या परिसरात अडकले. माञ वाहतूक कोंडी सुटत नसल्याने पोलीस ताफ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयापासून खुशकीच्या मार्गाने ते कसेबसे रवाना झाले. पालकमंञ्यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करताना सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली. या परिसरात सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.