आरोपी पकडण्यास गेलेल्या महिला पोलिसास मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावरील पोखर्डी शिवारात आरोपीस पकडण्या साठी गेलेल्या एमआयडीसी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत पती-पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच अटक वाचविण्यासाठी विषारी औषध पेवून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी पोखर्डी शिवारात गेले असता गुन्ह्यातील आरोपी नारायण गंगाधर घामुर्डे याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याची पत्नी संगिता नारायण घामुर्डे यांनी सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ व मारहाण केली.

तसेच नारायण यास अटक करू नये यासाठी संगिता हिने रोगर नावाचे विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत तीचा हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी गायत्री धनवडे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स. पो. नि. विनोद चव्हाण हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.