नगर शहराचा विकास फ्लेक्स बोर्डवरच : डॉ.सुजय विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुकुंदनगरमध्ये विविध गरीब कुटुंबे वास्तव्यास असून, ते वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले. किमान वैद्यकीय सेवा मिळवण्याचा नागरिकांचा अधिकार आहे. परंतु येथील लोकप्रतिनिधी मात्र कागदावरच अथवा फ्लेक्सवरच हजारो कोटींची विकास कामे झाल्याचे सांगतात. मात्र नगरमध्ये फ्लेक्स बोर्डवरच विकास दिसतो, विकास कुठे झाला ? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.


मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन ग्रामीण भागात आम्ही करीत आलो आहोत. आतापर्यंत सुमारे १५ शिबिर संपन्न झाली असून, त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. शहरी भागातही या शिबिरांची गरज ओळखून मुकुंदनगर परिसरात हे शिबिर घेण्यात आले आहे. 

कुठलीही निवडणूक अथवा लाभ मिळावा यासाठी आम्ही शिबीर आयोजित करत नाही तर दिवसेंदिवस वैद्यकीय सेवा महागडी होत असताना मोफत शिबिरे ही आजची गरज बनली आहेत. मनपाच्या सुविधांची नगरमध्ये वानवा असल्याचे चित्र आहे. 

लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्यापेक्षा फ्लेक्स लावण्यातच धन्यता मानताना दिसून येतात. आतापर्यंत त्यांनी कोणता विकास केला, हे जनतेसमोर येऊन सांगावे. नगरमध्ये फ्लेक्स बोर्डवरच विकास दिसतो, विकास कुठे झाला, असे ते म्हणाले. विकासाचे तीन तेरा कशे वाजवले जातात याचे मुकुंदनगर एक उत्तम उदहारण आहे..

जनसेवा फौंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मुकुंदनगर येथील जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेत आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरप्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.

जनता सुज्ञपणे निवडल्याशिवाय राहणार नाही 
मी अजून तरी कुठल्याही पक्षची उमेदवारी माघितली नाही तरी पण अनेक जण मला सल्ला देतात. मधुकरराव पिचड हे आपल्याला वडीलधारे आहेत. त्यामुळे त्यांना प्रतिउत्तर करणार नाही. परंतु वेळ आल्यावर जनतेला जो पर्याय योग्य वाटेल तो पर्याय जनता सुज्ञपणे निवडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो, असे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.