जामखेड दुहेरी खून खटला - १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथे शेतीच्या वादातून पिता-पुत्राची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत एम. देशपांडे यांनी दहा आरोपींना दोषी धरले. त्यापैकी पाच आरोपींना जन्मठेप व इतर पाच आरोपींना हयात असेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. अनिल एम.घोडके यांनी काम पाहिले. या खटल्याच्या निकालाकडे जामखेड तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
जन्मठेप झालेल्यांंमध्ये महादेव गहिनीनाथ बहीर, सुखदेव रघुनाथ बहीर, शहाजी रघुनाथ बहीर, मल्हारी कैलास बहीर, दादा किसन बहिर, राजेंद्र महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहीर, कैलास तात्या बा बहीर, सोमनाथ उध्दव बहिर, संदिप गणपत बहीर ( सर्व राहणार- काटेवाडी. ता. जामखेड) यांचा समावेश आहे.

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील मयत आसाराम यशवंत बहिर यांचे त्यांचेच भावकीतील महादेव गहिणीनाथ बहिर यांच्यात जमिनीच्या ताब्याबाबत वाद होते. यासंदर्भात परस्परविरुद्ध तहसीलदार, प्रांताधिकारी, नाशिक आयुक्त यांच्याकडे अपिल दाखल होते. जामखेड कोर्टात महादेव बहिर व इतरांनी आसाराम बहिर यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.

या दाव्यात मयत आसाराम याने मनाईच्या हुकूमाचा अर्ज दिला होता. तो कोर्टाने मंजूर केला. महादेव बहिर व इतरांनी प्रतिवादी यांच्या ताब्यास हरकत अडथळा करु नये, असा आदेश दिला, त्यामुळे चिडून जावून आरोपींनी मयत आसाराम यांना धमक्या देणे, मारहाण करणे, शेतात येण्यास प्रतिबंध करणे असा त्रास देण्यास सुरुवात केली. त्याबाबत मयत आसाराम याने जामखेड पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता, तसा गुन्हा दाखल झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.