आगामी निवडणुकीत ताकद दाखवून देणार - निलेश लंके.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जीवावर तीन वेळा आमदार झालेल्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करून कान्हूर पठार जिल्हा परिषद गट कोणाला सोडला तसेच पारनेर पंचायत समितीचे सभापती पद कोणाला दिले, याचा मी साक्षीदार असून, पक्ष अशा लोकांवर का? कारवाई करत नाही, असा सवाल माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी आ. विजय औटी यांचे नाव न घेता केला. पोखरी, ता. पारनेर येथे रविवारी नीलेश लंके प्रतिष्ठानची शाखा स्थापन करण्यात आली. या वेळी कार्यक्रमात ते बोलत होते. 


या वेळी लंके प्रतिष्ठानच्या वतीने कर्णबधीर व इतर रुग्णांची तपासणी करण्यात आली. व १०० वृध्दांना काठ्या वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी सभापती सुदाम पवार होते. या वेळी लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब शिर्के, सरपंच ठकाराम लंके, माजी सभापती सुदाम पवार, माजी पं. स. सदस्य राजेंद्र चौधरी, उद्योजक विजय औटी प्रशांत, औटी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष किरण तराळ, अनिल गंधाक्ते, संदीप सालके, अरुण पवार, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश गाजरे, गणेश दरेकर, सरपंच पोपटराव रासकर, सरपंच संदीप मगर, यांच्यासह लंके समर्थक उपस्थित होते. 

या वेळी लंके म्हणाले, लोकांवर व अधिकाऱ्यांवार दबाव आणून काही होत नसते. माझ्यावर अन्याय झाला आहे. जनतेशी माझ्याकडून कधीही गद्दारी होणार नाही.पारनेर तालुक्यात विकासपुरूष म्हणून कोणी मिरवू नये, शासनाच्या निधीतून तालुक्याचा विकास होणार आहे, काही लोक पारनेर तालुक्यातील ज़नतेची दिशाभूल करत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. याचा प्रत्यय आगामी विधानसभा निवडणुकीत येईल. 

प्रतिष्ठानचा शाखा हे फक्त गावागावातील माध्यम आहे. गोरगरिबांचे आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी कामकार्यकर्त्यांनी करावे. कोणी काणत्या पक्षविरोधी कारवाया काय केल्या, कान्हूर गट कोणाला सोडला व सभापती कोणाला केले, याचा सर्व डाटा माझ्याकडे आहे. या वेळी माजी सभापती सुदाम पवार, विजय औटी, प्रकाश गाजरे, प्रीतेश पानमंद, पोपट गुंड यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.