बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येचा तपासाला वेग मिळणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येचा तपास आता विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे.या पथकावर श्रीरामपूर चे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांचे नियंत्रण राहणार आहे. उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेला आरोपी सावकार नवनाथ वाघसह चौघांवर गुन्हे दाखल होऊन तब्बल एक महिना उलटला आहे.

पवार यांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांची नियुक्ती होती. एसआयटीच्या या पथकात अतिरीक्त पोलीस अधीक्षक पवार यांच्यासह संगमनेरचे उपअधीक्षक अशोक थोरात, कोतवालीचे निरीक्षक राजेंद्र रत्नपारखी, सहायक निरीक्षक नयन पाटील, यांचा पथकात समावेश होता.

उद्योजक पवार यांनी ३१ मार्चला आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चौघा सावकरांची नावे दिली होती. या घटनेला महिला उलट्यानंतरही एकालाच ताब्यात घेण्यात यश आले होते. या प्रकरणाच्या तपासात पुढे काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे हा तपास आता एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पाटील यांच्याकडील तपास काढून घेतला आहे. या प्रकरणासाठी एसआयटी पथक नेमल्याने आता या तपासाला वेग मिळणार आहे.

पवार यांनी पुणे महामार्गावरील त्यांच्या कार्यालयात स्वत:च्या पिस्तुलातून गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांनी स्टॅम्पपेपरवर चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्रास देणार्‍या सावकारांची नावे आहेत. त्यामध्ये नवनाथ वाघ (बुरूडगाव,ता.नगर), विनायक रणसिंग, यशवंत कदम, कटारिया जिजी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात पवार यांची कन्या अमृताने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांपैकी वाघ सोडता तिघे फरार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.