खुशखबर : बँक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बँक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबाबत बँकांचे प्रतिनिधी व बँक कर्मचारी संघटनांची एक बैठक ५ मे रोजी होणार असून, यामध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या वाढीबाबत एकमत व्हावे, यासाठी बैठक उपयुक्त ठरेल, असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. कर्मचारी संघटना २५ टक्के वेतनवाढीची मागणी करत असून, सरकार ही वाढ १०-१५ टक्के इतकी देण्याबाबत सर्वांची सहमती इच्छित आहे. 


वास्तविक नोव्हेंबर २०१७ पासून बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीचा प्रश्न अडकून पडला आहे. त्यानंतर अनेक बैठकाही झालेल्या आहेत. मात्र, सर्वसंमती काही मिळालेली नाही. सरकारनेही त्यानंतर कोणतीही बैठक बोलावलेल्या नाह. मात्र, आता लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने सरकार निवडणुकांपूर्वी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न सोडवू पाहत आहे. वेतनवाढ झाली नाही, तर राजकीय मैदानात बँक कर्मचाऱ्यांची नाराजी सहन करावी लागू शकेल. यामुळे आता सरकारही त्याबाबत लक्ष घालत आहे, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.

वेतनवाढ न झाल्याने बँक कर्मचारी नाराज असून, गेल्यावेळीही केंद्राने हा प्रश्न बराच काळ ताणून धरला होता. मात्र, हे सरकार वेतनवाढ करण्याबाबत काही करील, अशी आशा होती. मात्र, त्यांनीही कर्मचाऱ्यांना निराश केले असल्याचे एका बँक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.आम्ही आमच्या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. मात्र, सरकार मागण्या ऐकून घेते. मात्र, सरकार त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाही. त्यांना काय सांगायचे ते सांगत नाही. किती वेतनवाढ देता येऊ शकेल, हे सरकारने चर्चेच्यावेळी स्पष्ट करायला हवे, मात्र ते सांगत नाहीत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.