१० जूनपासून शेतकऱ्यांचा देशव्यापी संप,शहरांमध्ये शेतमाल पाठवणे होणार बंद !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केंद्र सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ येत्या १०  जून रोजी शेतकरी देशव्यापी बंद पाळणार आहेत. त्याआधी १ जूनपासून सलग दहा दिवस शेतमालाचा पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. किसान महासंघाच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी किसान महासंघाने हा देशव्यापी बंद पुकारला आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकतेच भाजपाला कायमचा रामराम ठोकून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा हेही या आंदोलनात सहभागी आहेत.

'शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे सरकारने दिलेले आश्वासन अद्याप सत्यात उतरलेले नाही. त्याचप्रमाणे मोदी सरकारची धोरणे ही शेतकरीविरोधी अशीच राहिली आहेत. पंतप्रधान मोदी ज्या काही घोषणा करतात त्या केवळ थापाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही. याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. १ जूनपासून देशभरातील शेतकरी भाज्या, फळे, दूध यासारखा शेतमाल शहरांमध्ये पाठवणे बंद करणार आहेत. ६ जून रोजी शेतकरी 'असहकार दिन' पाळणार आहेत,' असे सिन्हा यांनी सांगितले. .

प्रमुख मागण्या .
१) शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना सरसकट सातबारा कोरा अशी कर्जमाफी द्या .
२) उत्पादन खर्च ५० टक्के हमीभाव.
३) शेती व शेतीपूरक व्यवसाय यांना मोफत वीज.
४) संरक्षित शेती उत्पन्न कायदा (ईमा) कायद्याची अंमलबजावणी करा .
५) दुधाला कमीत कमी ५० रुपये स्थिर भाव द्या.
६) बैलगाडा शर्यत व तत्सम स्पर्धांना कायदेशीर मान्यता द्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.