केडगाव दगडफेक प्रकरण - कारवाईच्या भीतीने शिवसैनिक सैरभैर !




अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर ७ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने धरपकड करून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या धडक कारवाईबाबत पोलिसांनी बाळगलेल्या गोपनीयतेमुळे शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली असून, कारवाईच्या भीतीने शिवसैनिक सैरभैर झाले आहेत.

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणानंतर झालेल्या तोडफोडप्रकरणातील शिवसैनिकांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शोधमोहीम राबवून धरपकड सुरू केली आहे. नगरसेवक सचिन जाधव, दीपक सर्जेराव कावळे, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, रावसाहेब नारायण भाकरे, विठ्ठल नानाभाऊ सातपुते, सुशांत गिरीधर म्हस्के, राजेंद्र मोहनराव पठारे यांना पोलिसांनी काल दुपारी ताब्यात घेण्यात आले आहे. या धरपकड मोहिमेत आरोपींना थेट घरातूनच ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले आहे, अशी विश्‍वसनीय सूंत्राकडून माहिती मिळाली आहे.

7 एप्रिल रोजी दोन शिवसैनिकांनी हत्या झाल्यानंतर केडगाव भागात तुफान दगडफेक झाली होती. या हल्ल्यात पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळसह मारहाण झाली होती. या हल्ल्यात शिवसैनिकांचा समावेश असलेल्या 600 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी 9 शिवसैनिक तब्बल महिनाभरानंतर सोमवारी (दि. 7) रोजी पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर राहून अटक करुन घेतली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.