अहमदनगरच्या भक्ती मते यांनी पटकाविला मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विवाहानंतर चुल व मुल यापलीकडे जावून आपल्या आवडत्या क्षेत्रात मोठ्या आत्मविश्‍वास व जिद्दीने स्वत:ला झोकून नगरच्या भक्ती मते यांनी जयपुर येथे झालेल्या आर्चिज मिसेस इंडिया या सौंदर्यवती स्पर्धेत मिसेस ग्रेसफुल इंडियाचा मुकुट पटकाविला. संपुर्ण भारतातून या स्पर्धेसाठी चाळीस महिलांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल आपले स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया मते यांनी दिली.मॉडलिंग क्षेत्राची पहिल्यापासूनच आवड असल्याने ही आवड भक्ती मते यांनी लग्नानंतर देखील जोपासली. जिद्द व कष्टापुढे आकाशही ठेंगणे या प्रमाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मॉडलिंग स्पर्धेत त्या सहभागी होवू लागल्या. शहरात पेज थ्री च्या वतीने महिला दिनी पार पडलेल्या मिसेस अहमदनगर स्पर्धेत त्यांनी मिसेस टॅलेण्टेड हे सब टायटल मिळवले होते. 

त्यांच्या गुणवत्तेची पारख करुन पेज थ्री चे संचालक फरिद सय्यद, आफरोज शेख व स्वप्नाली जांबे यांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या आर्चिज मिसेस इंडिया ची माहिती देवून, यामध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे ऑडीशन पुणे येथे घेण्यात आले. यामध्ये भक्ती मते यांची निवड झाली. या स्पर्धेसाठी संपुर्ण देशातून चाळीस महिलांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या महिलांना दि.28 एप्रिल ते 2 मे पर्यंन्त जयपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ग्रुमिंग बोलायचे कसे, प्रश्‍नाला कशा पध्दतीने उत्तर द्यावे, आत्मविश्‍वास वाढविणे हे या प्रशिक्षणात शिकविण्यात आले.

दि. 3 मे ला आर्चिज मिसेस इंडिया चा फिनाले शो जयपुर येथील हॉटेल क्लार्कस आमेर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेत आपले सौंदर्य व बुध्दीमत्तेच्या जोरावर देशातील पहिल्या पाच मध्ये गुणवत्ता सिध्द करीत मसेस ग्रेसफुल इंडियाचा बहुमान मते यांनी पटकाविला. याबद्दल मते यांचा नुकताच पेज थ्री च्या वतीने सत्कार करण्यात आला.

लग्नानंतर आयुष्य संपत नाही
लग्नानंतर मुल बाळ झाल्यावर आयुष्य संपत नाही. महिलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात लग्नानंतर देखील काम केले पाहिजे. यामुळे जीवनात एक वेगळा आनंद मिळत असतो. आत्मविश्‍वासाने आवडीच्या क्षेत्रात काम केल्यास निश्‍चित आत्मसन्मान वाढतो. कुटुंबाचा सांभाळ करुन आपली स्वप्ने स्त्रीया पुर्ण करु शकतात. हा पुरस्कार माझ्या कुटुंबीयांना समर्पित असून, त्यांच्या पाठपबळाने ही स्पर्धेतील अंतिम फेरी गाठता आल्याची भावना भक्ती मते यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.