दोनशे रुपयांच्या लाच प्रकरणी दोघांना चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर येथे दाखल अपिलाची नोटीस बजावणी करून तसा रिपोर्ट कोर्टाला पाठविण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागणाऱ्या अकोले दिवाणी न्यायालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यास चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा जिल्हा न्यायाधिश एच. एम. भोसले यांनी सुनावली आहे. 


या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. एम. पी. गवते यांनी काम पाहिले. . याबाबत सविस्तर माहिती अशी की, कैलास लक्ष्मण भरितकर (बेलिफ दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, अकोले) यांनी तक्रारदाराचे जिल्हा सत्र न्यायालय नगर येथे दाखल अपिलाची नोटीस बजावणी करून तसा रिपोर्ट कोर्टाला पाठविण्यासाठी दोनशे रुपये लाचेची मागणी केली होती. 

त्यावरून तक्रारदाराने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता २७ जानेवारी २०१६ रोजी अकोले न्यायालयाच्या आवारात कैलास भरितकर यांनी तक्रारदाराकडून दोनशे रुपयांची लाच स्विकारली व दिनेश नरहरी बनसोडे या आपल्या न्यायालयातील सहकाऱ्याकडे ती सोपवली. 

यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले होते. या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय मुतडक यांनी भरितकर व बनसोडे यांच्याविरुद्ध संगमनेर विशेष न्यायालयात १३ जुलै २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधिश एच. एम. भोसले यांच्यासमोर होवून त्यांनी दोघांना चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.