समृद्ध गाव करण्यासाठी प्रयत्नशील राहणार: वैभव पुरनाळे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समृद्ध देश घडविण्यासाठी समृद्ध गाव असणे प्रथम गरजेचे आहे.त्याच मुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी,संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील समृद्ध गाव बनविण्यासाठी पदाचा सदुपयोग करेल.असे प्रतिपादन भगूर (ता.शेवगाव) गावचे लोकनियुक्त युवा सरपंच वैभव प्रदिपराव पुरनाळे यांनी केले. आत्मनिर्धार फाऊंडेशन व नातेवाईक,मित्र परिवारा तर्फे आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते.हा सत्कार वैभव यांच्या आजी सौ.अंजना जिवडे व आई-वडील सौ.विमल पुरनाळे व श्री.प्रदिपराव पुरनाळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सरपंच पदाचा कार्यभार हाती घेतल्या पासून गावातील अनेक सार्वजनिक व वैयक्तिक कामं पूर्णत्वास नेली आहेत तर काही चालू आहेत.येत्या काही दिवसात जलसंधारण व कृषीविषयक योजनां संदर्भातील विषयावरही आम्ही काम करणार आहोत.'घेतला वसा टाकणार' नाही या उक्ती प्रमाणेच लोकनियुक्त सरपंच पदाचे सर्व अधिकार वापरून 'लोककल्याणा'साठी सदैव तत्पर राहील.

या सत्कार समारंभाचे आयोजक तथा आत्मनिर्धार फाऊंडेशन चे समन्वयक संतोष शिंदे म्हणाले, वैभव यांनी 'अभिनव युवा प्रतिष्ठाण' च्या माध्यमातून भगूर व शेवगाव परिसरात तरुण मित्रांचे मोठे संघटन उभारून विविध सामाजिक कार्यक्रम राबवले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊनच भगूरकरांनी वैभवला आपला कौल दिला.राजकारणात वैभव सारख्या सुशिक्षित व सामाजिक जाण असणाऱ्या तरुणांची खरी गरज आहे.असेच तरुण सुस्त व बेशिस्त झालेल्या प्रशासनाकडून लोकोपयोगी कामं करून घेऊ शकतात.

याप्रसंगी कुसुम पुरनाळे,कमल शिंदे,रेखा शिंदे,वर्षा मोकाटे, वृषाली कोल्हे,विद्या म्हस्के, डॉ.बी.एम.शिंदे,गोवर्धन म्हस्के,दिगंबर उकिर्डे,सिद्धेश्वर कर्डिले,अमोल शिंदे,किरण पडोळे,राजेंद्र शिंदे,निखिल म्हस्के, अमोल गाडगे,एकनाथ जिवडे,अनिल जिवडे,दत्ता गणगे,किरण काळे,वैभव जिवडे,शेतकरी संघटनेचे युवा नेते संदिप गेरंगे,सचिन म्हस्के आदी उपस्थित होते.संतोष शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.तर किरण पडोळे यांनी यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.