गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्‍यातील जवळेकडलग मध्ये पन्नास वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.साळुंके यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली हे स्पष्ट झालेले नाही. 



याबाबर अधिक माहिती अशी की, जवळे कडलग येथील वाळीबा नारायण साळुंकेयांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी वाळीबा साळुंके दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना त्वरीत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.