एकतर्फी प्रेमातून पळवून नेत विवाहितेवर अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विवाहितेला मारहाण करून मोटारसायकलवरून पळवून नेऊन तिच्यावर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नगरमध्ये घडली. आरोपीने पीडित विवाहितेला एका घरात डांबून ठेवले होते. या घरातून स्वतःची सुटका करून पीडित विवाहिता तिच्या घरी गेली होती. त्यानंतर आरोपीने घरी जाऊन विवाहितेला व तिच्या घरच्यांना मारहाण केली. 


विवाहितेच्या फिर्यादीवरून मुकुंदनगरमधील अंडा गँगचा संबंधित गुन्हेगार जैद रशिद सय्यद ऊर्फ टप्या, अरबाज शेख ऊर्फ सनास सैपूल सय्यद यांच्याविरुद्ध अपहरण करणे, मारहाण, लैंगिक अत्याचार या कलमानुसार भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. 

या प्रकरणी फिर्याद देणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. मागील महिना भरापासून ती नगरला माहेरी राहते. पीडित विवाहिता सोमवारी सायंकाळी ब्युटी पार्लरला पायी जात होती. मुकुंदनगर भागातून पायी जात असताना टप्या व त्याचा मित्र अरबाज शेख या दोघांनी विवाहितेला रस्त्यावरच मारहाण करून मोटारसायकलवर बसवून दिल्लीगेट परिसरातील एका घरात नेले. टप्या याने मारहाण करून विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. 

गुंड टप्या याने, 'लग्न कर, लग्न न केल्यास तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकेल', अशी धमकीही विवाहितेला दिली. त्याच वेळी दोघे आरोपी फोनवर बोलत असताना विवाहितेने घरातून सुटका करून घेतली. एका रिक्षा चालकाच्या मदतीने घरच्यांना ही माहिती दिली. 

ही विवाहिता घरी आल्यानंतर टप्या व त्याचा भाऊ सैपुल सय्यद याने घरी येऊन पीडितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विवाहितेने तिघा आरोपींविरुद्ध भिंगार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला. लग्नापूर्वी विवाहितेला टप्या व त्याच्या साथीदाराने त्रास दिला होता. परंतु, भीतीपोटी गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.