पिचड साहेब, सेकंड इनिंगही तुमच्याबरोबरच लढू : आ.छगन भुजबळ


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी मंत्री मधुकर पिचड यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा आ. भुजबळ यांनी गळाभेट घेत पिचड साहेब, तुम्ही पहिल्या इनिंगला माझ्या बरोबर होता. सेकड इनिंगही तुमच्या बरोबर लढू, असा विश्वास देत भुजबळांना आश्रु आवरेनात.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी गेली दोन वर्षे अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि.4) जामीन मंजूर झाला. यानंतर आज माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी आ. भुजबळ यांची के.ई.एम.रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ यांनी तुरुंग प्रशासनाने आपल्याला कसा त्रास दिला. आपल्याला यात कशा प्रकारे अडकविले याचे सर्व कथन केले. तसेच त्यांना हे सर्व सांगताना आपली प्रकृती कशी खालावत गेली. स्वादुपिंडाच्या त्रासाने कसे ग्रासले हे सांगतांना आश्रून आवरत नव्हते. पिचड यांना पाहिल्यावर भुजबळ यांचे डोळे पाणावले होते.

पिचड यांच्या बरोबरच्या सर्व आठवणींना भुजबळ यांनी उजाळा देत. या देशाला शरद पवार यांच्यासारख्या नेत्याची गरज असून त्यांचा पाय मुरगळला आहे. तरी पण ते शेतकऱ्यांसाठी बाहेर फिरत आहेत. त्यांना माझा निरोप द्या की, थोडा आराम करा. फिरू नका. आज ते सोडून देशाला तारणारा कोणीही नेता सध्या तरी दिसत नाही, असे भावना विवश होऊन भुजबळ बोलत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.