पोलिसांच्या कारवाईमुळे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्या घटली

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेक व शिवीगाळप्रकरणी 600 जणांवर गुन्हे दाखल झाले. परंतु एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात धजावत नसलेले पोलिस प्रशासन आता कठोर कारवाईच्या तयारीला लागले आहे. पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करण्याचे सत्र सुरू केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 



चौकशीदरम्यान सोमवारी अटक केलेल्यांपैकी काही आरोपींना पोटदुखी सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची संख्याही कमालीची घटली आहे. आरोपींची धरपकड मोहीम जोर धरु लागली असून गुन्हे दाखल झाल्याच्या महिनाभरानंतर पोलिसांनाही आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा साक्षात्कार झाला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.