केडगावपेक्षाही जास्त दहशत मुकुंदनगर मध्ये !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील दहा-बारा वर्षांपासून मुकुंदनगरमध्ये अंडा गँगची दहशत आहे. अंड्याच्या व्यावसायाशी संबंधित काही व्यक्ती ही गँग चालवित असल्याने अंडा गँग म्हणून ही टोळी ओळखली जाते. मुकुंदनगरमधील रहिवाशांसोबतच शहराच्या काही भागातही या टोळीचा सतत उपद्रव असतो. अनेकदा गुन्हे दाखल झाले, अटक झाली तरीही कारवाया थांबत नाहीत. 


बहुतांश नागरिक तक्रार देणे टाळत असल्याने टोळीचे धाडस वाढत आहे. जागांचे व्यवहार, व्यवसाय करण्यासाठी संरक्षण देण्याच्या नावाखाली खंडणी, घरे रिकामी करून देणे असे अनेक प्रकारचे गुन्हे येथे सुरू आहेत. महिलांची छेड काढण्याचे आणि किरकोळ भांडणांचे प्रकार सतत घडत आहेत. यामुळे मुकुंदनगरमध्ये या टोळीची मोठी दशहत आहे.

केडगाव आणि जामखेडमधील दुहेरी खुनाच्या घटनांनतर पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विविध उपाय सुरू केले आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच प्रयत्न मुकुंदनगरमध्येही होण्याची गरज आहे.

खंडणी, हाणामाऱ्या, महिलांची छेड ते थेट महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत मुकुंदनगरच्या अंडा गॅंगचा उपद्रव सुरूच आहे. दुहेरी खुनाच्या निमित्ताने केडगावमधील दहशत चर्चेत आली, त्याहीपेक्षा जास्त दहशत मुकुंदनगरमध्ये असल्याचे पहायला मिळते. पोलिसांनी सध्या टोळ्यांच्या बंदोबस्ताचे काम सुरू केलेच आहे, तर त्यांनी मुकुंदनगरकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अलीकडेच एका महिलेचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना पुढे आली असून त्यातही या टोळीचा संबंध आढळून आला आहे. मुळात मुकुंदनगर या उपनगरातही कायमच दहशतीचे वातावरण आहे. केडगावपेक्षाही येथील परिस्थिती भयाण आहे. उपद्रवी टोळ्यांना राजकीय आश्रय मिळू लागल्याने त्यांचे धाडस वाढत असून सामान्य नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.