IPL 2018 महामुकाबला - चेन्नई ठरली सुपरकिंग,हैदराबादचा दारुण पराभव !अहमदनगर लाईव्ह24.कॉम :IPL-2018 ची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर खेळवली गेली आज सनरायझर्स हैदराबाद ने प्रथम फलांदाजी करताना चेन्नई सुपरकिंग समोर विजयासाठी १७९ धावांचे लक्ष ठेवले होते.
या लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरवात संथ गतीने झाली मात्र त्यानंतर सुरेश रैना आणि व्हाॅटसन या दोघांनी दमदार खेळी करत धावफलक वेगाने पुढे नेला, व्हाॅटसनने अवघ्या ५१ चेंडूत शतक ठोकले 

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने युसूफ पठाण नाबाद ४५, कर्णधार केन विलियम्सन ४७ आणि ब्रेथवेटच्या तुफानी २१ धावांच्या बळावर २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या. चेन्नईकडून निगडी, ठाकूर, करण शर्मा, ब्राव्हो आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला.


कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज बाजी मारणार की कॅप्टन केन विलियमसनची हैद्राबाद टीम ट्रॉफी जिंकणार याचीच उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली होती.मात्र यात सुपरकिंग्जने बाजी मारली, आजचा सामना जिंकल्याने चेन्नईचं हे आयपीएलमधलं तिसरं विजेतेपद ठरले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.