काका तुम्हाला घाण राजकारण कधी जमले नाही त्याचेच फळ आज आपण भोगत आहोत का?

तुम्ही कधी कोणत्याच विरोधकाला खालच्या थराला जाऊन कधीही विरोध न करता 'विरोध हा विचारांचा करायचा असतो व्यक्तीचा नाही' असे आम्हाला नेहमी ठणकावून सांगत राहिलात. त्यांच्या वृत्ती प्रमाणे जर तुम्ही त्यांचे उद्योग-धंदे किंवा नौकऱ्यांवर अडचणी आणल्या असत्या तर कदाचित आज ही वेळ आली नसती. 


पण निवडणुकीत आपल्याला उघड उघड विरोध करणाऱ्या विरोधातील व्यक्तींचे त्यांनी तुमच्याकडे आणलेले वैयक्तीक किंवा सामाजिक कामे क्षणाचा विचारही न करता करून दिलीत. आणि त्यामुळे आपण कसही वागलो तरी काका नंतर मनावर नाही घेत ही भावना दृढ झाली व त्याचाच हा परिणाम का?

माझा तुमच्याशी परिचय होण्यापूर्वी मी असं ऐकलं होतं की काकांची खूप दहशत आहे आणि डोळ्यात डोळे घालून बोलले की काका खूप मारायला लावतात. पण, काका तुम्ही तर माझ्या खांद्यावर हात ठेवत नेहमी मायेने माझी विचारपूस केलीत. एवढंच काय *अभ्यास न करता कुठं फिरतो?? हा प्रश्न माझ्या आई-बापा पेक्षाही जास्त वेळा आपण विचारलात.

मला आठवतं चांगलं,
मी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी रहावे लागत असताना *सज्जड दम देत बाहेरच्या टुकार मुलांच्या नादी लागायचं नाही, व्यसनाच्या आहारी गेलास तर बघ, अजून जास्त अभ्यास कर* म्हणत त्या शहरातील आपल्या मित्रपरिवाराला फोनवर मला काहीही मदत लागल्यास करा अशी विनंती करताना मी पाहिलंय काका तुम्हाला.

संग्रामभैय्या यांची आमदारकीची निवडणूक होती आणि मी महिनाभर आधी आलो तर, मला रागावून अभ्यास का सोडून आला तू?? असं विचारणारे तुम्हीच होते. राजकारणी स्वार्थासाठी कार्यकर्ते वापरतात अशी प्रथा आहे मात्र तुमच्याकडे सगळं निराळंच !

माझ्या आयुष्यात भयंकर प्रसंग आला, मी मरणाच्या दारात पोहोचलो तेव्हा मला सर्वोच्च वैद्यकीय तपासणी व डॉक्टर ची गरज होती.आपल्याला कळलं मी जास्त आजारी आहे, आपण पुण्याला मला भेटायला आलात तेव्हा डॉक्टर म्हणाले मुंबई ला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावा लागेल खूप खर्च लागेल. 

काका गरजले आमची तुम्ही म्हणाल तेवढा खर्च करण्याची तयारी आहे तुम्ही त्याची काळजी करू नका मुंबई काय पण अमेरिकेत जर न्यायचं असेल तरी सांगा !अहो, ज्या काळात नातेवाईकही आपल्याला पैसे मागतील म्हणून भेटायलाही येत नाहीत अशा काळात काका आणि संपूर्ण जगताप कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
असे हे दुसऱ्यासाठी देव पाण्यात ठेवणारे हे जगताप कुटुंब !
येवढं करूनही सगळं श्रेय परमेश्वराला देऊन मोकळे होतात काका तुम्ही. कदाचित याच निस्वार्थ वागण्यामुळे राज्यातही एखाद्या राजकारणी व्यक्तीच्या एवढा आदर केला जात नसावा आणि म्हणून तुमच्या अवती-भवती माणसांचा गराळा असतो नेहमीच.

याचाच पोटशूळ आजवर विरोधकांना आहे की, मी २५ वर्ष आमदार होतो तरी काकांच्या नखाचीही सर करता नाही आली आणि कोणत्याही ठिकाणी चर्चा आणि कुतूहल हे फक्त काका या व्यक्तीचंच !
याचाच परिणाम की रात्रंदिवस हे लोक फक्त काकांना कसं बदनाम करत लोकांना यांच्यापासून लांब ठेवता येईल  याचासाठी वाट्टेल ते आरोप करत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवायचे.विरोधकांना माहीत आहे की, आपण यांच्या चारित्र्यावर हल्ला नाही केला तर एक दिवस असा येईल की औषधाला पण आपल्याजवळ माणूस नाही राहणार !

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.