विखे पाटलांचे दक्षिणेचे प्रेम आताच कसे उफाळून आले..?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दक्षिण नगरचा वापर राजकीय रणांगण म्हणून करून घ्यायचा आणि विकासाचा निधी उत्तरेत पळावयाचा, हे उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहेत. अहमदनगरच्या जिल्हा विभाजनाला विरोध करून डॉ. सुजय विखे यांनी त्यांचे खरे रुप समाजाला दाखविले आहे. हे सर्व बोलण्याचे त्यांचे वय नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
डॉ. विखे यांनी दोन दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यात बोलताना जिल्हा विभाजनाची गरज नसल्याचे सांगितले. याबाबत ढाकणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन विखे यांच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बंडू बोरुडे, सरचिटणीस सीताराम बोरुडे, उषा बडे पतसंस्थेचे अध्यक्ष अमोल बडे, युवक आघाडीचे योगेश रासने, चंद्रकांत भापकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

अॅड. ढाकणे म्हणाले, १९८० पासून जिल्हा विभाजनाची मागणी आहे. त्यावेळी सर्व लोकप्रतिनिधींच्या सह्या आहेत. विकासाची गरज दक्षिणेला आहे. जिल्हा विभाजनाची गरज नाही, असे म्हणणे निषेधार्थ आहे. ही जनतेची मागणी आहे. कोणा एकाच्या मतावर चळवळ चालत नाही. 

लोकांना भुलवता येईल. या भ्रमात राहू नका !
दक्षिणेत भांडणे लावून द्यायची. काम झाले की सोडून द्यायचे. तुमची आर्थिक ताकद आम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक वेळी या ताकदीच्या जोरावर लोकांना भुलवता येईल. या भ्रमात राहू नका. तुम्ही पोटभर खा आणि आम्ही अर्धपोटी आहोत. आमचे दुःख आम्हाला कळते तुमचे उद्योग तुम्ही पहा इकडे कशाला डोकं लावता. एक कोटी रुपयांचा निधी एका तालुक्यासाठी जाहीर करणारे तुम्ही कोण? 

तुम्ही मोठे होत असताना आम्हाला लहान करू नका. 
जिल्हा परिषदेच्या आगामी बैठकीत यावर चर्चा घडून आणू. पालकमंत्री दक्षिणेचे आहेत. जनतेच्या वेदना त्यांना माहीत आहेत. त्यांच्यामुळेच जिल्हा विभाजन होणार आहे. तुम्ही मोठे होत असताना आम्हाला लहान करू नका, असेही ढाकणे म्हणाले. जिल्हा विभाजनासाठी आपण सर्व तालुक्यातील समविचारी लोकांना भेटून प्रभावी सर्व उभा करू, असेही ढाकणे म्हणाले. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दक्षिणेतील सर्वपक्षीय नेत्यांनी संघटित व्हावे.
पाथर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडीत ढाकणे म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाचा विषय तातडीने मंत्रिमंडळासमोर आणावा. दक्षिणेतील सर्वपक्षीय नेत्यांनी संघटित होऊन हा विषय मार्गी लावावा. जामखेड येथे कार्यक्रमात बोलताना डॉ. सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनाला विरोध केला आहे. 

उत्तरेतील धनदांडग्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा निधी पळविला
याबाबत वृत्तपत्रांत बातम्या वाचून मी व्यथित झालो. जिल्हा विभाजनाची मागणी सर्वपक्षीय नेते व सामान्य माणसांची आहे. उत्तरेतील धनदांडग्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा निधी आजपर्यंत पळविला आहे. केंद्र व राज्य कसरकाच्या योजना उत्तरेत घेऊन जाण्यात तिकडची मंडळी माहीर आहे. 

डॉ. विखे व अॅड. ढाकणे यांच्यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे !
दक्षिणेतील सर्वपक्षियांनी एकत्र येण्याची गरज आहे. विभाजन चळवळीचा इतिहास अभ्यासा मग बोलत जा असा सल्ला ढाकणे यांनी डॉ. सुजय विखे यांना दिला. ढाकणेंच्या या भूमिकेमुळे जिल्हा विभाजनाच्या मुद्यावरून नगर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉ. विखे व अॅड. ढाकणे यांच्यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे अाहेत. 

त्यांच्या ओठावरचे दुधही अजून सुकले नाही
दक्षिणेचे राजकीय रणांगण वापरून घ्यायचे आणि फायदा असला की, मग दक्षिणेवर अन्याय करायचा. उत्तरेतील नेते पैसा व सत्ता, यामुळे प्रबळ आहेत. आपसांत ठरवून भांडणे केल्याचे दाखवून स्वार्थ साधायचा, असा हा उद्योग आहे. सुजय विखे हे राजकारणी नाहीत व भरकटलेले आहेत, असे ते स्वत:च कबूल करीत आहेत. त्यांच्या ओठावरचे दुधही अजून सुकले नाही. त्यांनी जिल्हा विभाजनाला विरोध करू नये.

दक्षिणेतील नेते विकास करण्यासाठी सक्षम
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होते,मग नगरचे का नको, असा प्रश्न ढाकणे यांनी उपस्थित केला. दक्षिणेतील नेते येथील विकास करण्यासाठी सक्षम आहेत. पाण्याचा दुष्काळ आहे. उत्तरेतील नेत्यांनी लुडबूड करू नये. जिल्हा परिषदेतील निधी वाटप करणारे हे कोण? 

ते दक्षिणेत येऊन भांडणे लावतात !
राष्ट्रवादीचे सदस्य जिल्हा परिषद सभागृहात याबाबत आवाज उठवतील. उत्तरेतील नेते दक्षिणेत येऊन भांडणे लावतात. पाथर्डी नगरपालिकेत विखे यांनी तिसरा पॅनल करून भांडणे लावली. सत्ता व संपत्तीचे प्रदर्शन जनतेला मान्य नसते. 

राजकीय स्वार्थासाठी जिल्हा विभाजनाला विरोध नकाे 
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे व ॲड. प्रताप ढाकणे यांच्यातील सामना रंगण्याची चिन्हे आहेत. विखेंनी जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. त्यानंतर लगेचच ढाकणे यांनी शेतकरी फाउंडेशनच्या माध्यमातून मुलगा ऋषिकेश याला सक्रिय केले. भाजपतर्फे लोकसभेसाठी आमदार मोनिका राजळे व पालकमंत्री राम शिंदे यांची नावे पातळीवरून पुढे येत आहेत.

विखे राजकारणात भरकटले !
डॉ. सुजय विखे हे होलिकॉप्टर घेऊन फिरतात. राजकराणातले बरेच काही विखेंना समजायला अजून वेळ लागेल. ते स्वत:च मी भरकटलेला आहे व राजकारणी नाही, असे जाहीर भाषणांतून सांगत आहेत. जनता काय असते, हे त्यांना समजेलच, असा टोलाही ढाकणे यांनी या वेळी लावला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.