अशोक लांडे हत्येनंतर जगताप,कोतकर,कर्डिले परिवार पुन्हा संकटात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. दोघांचेही मृतदेह झाकल्यानंतर शिवसैनिकांनी पोलिसांना हातही लावू दिला नव्हता.----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल हा कॉँग्रेसकडून विजयी झाला. त्यानं शिवसेनेच्या विजय पटारेचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये राजकीय वाद झाला होता. त्याचबरोबर शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळे याचंच पर्यवसान हत्यांमध्ये झाल्याची शक्यता आहे.शिवसैनिकांची निर्घृण हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या तक्रारी वरून आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
राष्ट्रवादीकडून विधानसभेतील आमदार संग्राम जगताप  आहेत, तर वडील अरुण जगताप विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे.राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.