केडगाव हत्याकांड - आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हा बंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी संपून निकाल जाहीर झाल्यानंतर नगरच्या केडगाव उपनगरात दोन शिवसैनिकांची गोळीबार आणि कोयत्याने हत्या करण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने दगडफेक केली. यामध्ये पोलिसांच्या वाहनांनाही लक्ष्य करण्यात आले नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेतर्फे रास्ता रोको करण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी रविवारी 'जिल्हा बंद'चे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड, दक्षिण नगरचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, सभागृह नेता गणेश कवडे, संजय शेंडगे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, नगरसेवक योगीराज गाडे, विक्रम राठोड आदींनी घटनास्थळी गुन्हा दाखल होईपर्यंत तळ ठोकून होते. 

अनिलभैय्या राठोड यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. केडगाव पोटनिवडुकीपासून येथे होत असलेल्या दहशतीची माहिती दिली जात आहे. त्यावर कारवाईची मागणी करत आहोत. तरी देखील पोलीस बघ्याच्याच भूमिकेत होते. या प्रकाराला जबाबदार असलेले पोलीस अधिकारी अक्षय शिंदे व अभय परमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून केली आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दिपक केसरकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्या (रविवारी) नगरमध्ये येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. दक्षिण नगरचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज नगर जिल्हा बंदची हाक दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.