अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या उपशहरप्रमुखाची हत्‍या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केडगाव उपनगरातील सुवर्णनगर परिसरात दोघांची सिनेस्टाईल हत्या करण्यात आली. सुरूवातीला तलवारीने वार करून त्यानंतर गोळीबार त्‍यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्‍या. या हल्‍ल्‍यात दोघांचाही मृत्‍यू झाला. संजय कोतकर (शिवसेना उपशहरप्रमुख) आणि वसंत ठुबे अशी मृत्‍यू झालेल्‍या दोघांची नावे आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
 ------------------------------- 
महानगरपालिका पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाल्यानंतर केडगावमध्ये गोळीबार आणि कोयत्यानं वार करून दोघांची हत्या करण्यात आली.महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झाले. विजयनांतर केडगावमध्ये जल्लोष करण्यात आला. 

विशाल हे माजी महापौर आणि अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा झालेले संदीप कोतकर यांचे भाऊ आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला.या निवडणूक वादातूनच संध्याकाळी दोघांची हत्या करण्यात आली.

संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी दोघा जणांनी त्यांच्यावर रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केल्याचे समजते. काही जणांनी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा वाहनावरून पाठलाग केला. त्यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या आणि नंतर कोयत्याने वार करण्यात आले. यात दोघेही ठार झाले. दोघांचे मृतदेह बराच काळ रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. दहशतीमुळे कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. संतप्त जमावाने परिसरातील वाहनांवर जोरदार दगडफेकीला सुरूवात केली. यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी व रहिवाशांनी घरे व दुकाने बंद करून घेतली. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.सध्या सुवर्णनगर परिसरात वातावरण तनावपूर्ण बनले असून, जादा पोलीस कुमक पाचारण करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.