२ लाख ५५ हजार शेतकऱ्यांच्या खाती ९०३ कोटी जमा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर काल गुरूवार दि ५ एप्रिल अखेर ९०३ कोटी ८६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत पात्र २ लाख ७ हजार ८८० लाभार्थ्यांना ६०६ कोटी ९२ लाख रुपयांचा तर इतर बॅंकांमार्फत पात्र ४७ हजार २५३ लाभार्थ्यांना रक्कम रूपये २९६ कोटी ९४ लाख रूपये जमा करण्यात आले असल्याची माहित सहायक निबंधक हरिश्­चंद्र कांबळे यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून आधार कार्ड आधारित ऑनलाइन अपलोड केलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३ लाख १५ हजार १०० इतकी आहे तर आधार कार्डशिवाय ऑनलाइन अपलोड केलेल्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे २० हजार आहे. राज्यात सर्वात जास्त अहमदनगर जिल्ह्यातून अर्ज भरण्यात आले होते. २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीअखेर जिल्हाभरातील ३ लाख ३४ हजार ९२० शेतकऱ्यांनी अर्ज आपले सरकार पोर्टलवर अपलोड केले.

शेतकऱ्यांनी भरलेले अर्ज कर्जमाफीसाठी पात्र आहे की नाही, अशा अर्जांची फेरतपासणी आता शासनाकडून केली जात आहे. दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ केले. नियमित कर्जदारांना २५ हजारांपर्यंत सूट दिली. त्यामुळे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात येत आहे, असे अनेकवार सांगण्यात आल्याने तांत्रिक अडचणींवर तसेच इंटरनेट, सर्व्हरसह अनेक गोष्टींवर मात करत शेतकऱ्यांनी अर्ज भरले असून, शासनाकडून शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

अद्यापपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर ९०३ कोटी ८६ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. ऑनलाइन भरलेल्या अर्जांचे गावपातळीवरील समितीने गावात जाऊन केलेल्या सर्व्हेनुसार प्राथमिक पडताळणी अहवालाशी जुळवल्यानंतर पुन्हा हा अहवाल तालुका समितीकडे अपलोड केला गेला , त्यानंतर अर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रीन लीस्टमध्ये समाविष्ट असणाऱ्या २ लाख ५५ हजार लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर कालअखेर ९०३ .८६ कोटी वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी राज्यशासनाकडे १० कोटींची मागणी केली आहे. नव्याने वाढविलेल्या विहित मुदतीत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त होतील त्याची पडताळणी करून ग्रीन लिस्ट बनवण्यात येईल व त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याची माहिती सहायक निबंधक हरिश्­चंद्र कांबळे यांनी दिली. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.